बळीराजावरील अन्याय सहन करणार नाही

0
31

गोंदिया,- प्रशासकीय यंत्रणा,निसर्गाच्या वृक्रद़ृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या
शेतकर्‍यांना बँका पीककर्ज नाकारत आहेत. नवीन सभासदांना पीकर्ज देण्यात येत नाही. खंडित सभाषदांना कर्ज देऊ नये, असा वटहुकूम जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी काढना आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक पात्र शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यात यावे. माझ्या बळीराजावरील अन्याय कदापी सहन करणार नाही. पीककर्जाचे लक्ष्यांक सर्व बँकांनी पुर्ण करावे, असे निर्देस आ. विनोद अग्रवाल यांनी येथील पंचायत समितीच्या सभागृहात 25 जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत उपस्थित बँक अधिकारी व प्रतिनिधिंना दिले.
पुढे अग्रवाल म्हणाले, शासनाच्या धोरण व नियमाप्रमाणे अधिकारी, कर्मचार्‍यांनी कार्य करावे, अनेक शेतकरी कर्ज
घेण्यास पात्र असूनही त्यांना कर्ज मिळत नाही, पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सदर तक्रार करून कार्यवाही करण्याचे अग्रवालांनी अधिकार्‍यांना ठणकावले. शेतकर्‍यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, बँकेकडे पैसे नसतील तर नाबार्ड पैसे द्यायला तयार आहे.विभागीय बँका कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी टाळाटाळ करू नका, त्यांच्या समस्या,अडचणींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देशही अग्रवालांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.बैठकीत विविध बँकांकडून वाटप झालेल्या कर्जाची माहिती तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे पात्र लाभार्थ्याना पीक कर्ज वाटप करण्यात आले की नाही, दिलेल्या लक्षांकाप्रमाणे कर्जाचे वाटप झाले की नाही? याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रभारी जिल्हा निबंधक सोनकर, एलडीएम उदय खरडणवीस, पंस सभापती मुनेश रहांगडाले,उपसभापती नीरजसिंहसिं नागपुरेपुरे,भाऊराव उके, छत्रपाल तुरकर,खंड विकास अधिकारी पुराम, पंकज यादव, मोहन गौतम, पृथ्वीराजसिंह नागपुरे, राजू नोतारकर, विक्की बघेले, अजित टेंभरे, अंकेश येडे, कपिल राणे, मनीष वैष्णव आदींची उपस्थिती होती.