महाऔष्णिक वीज केंद्राला भीषण आग

0
7

चंद्रपूर,दि.6- येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगाव्हॅट संचाचा कन्व्हेअरबेल्टला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली.या आगीत जवळपास एक कोटीपेक्षा जास्त नूकसान झाल्याची शक्यता आहे. सीएचबी ५००बी विभागातील कन्व्हेअरबेल्टला ही आग लागली आहे. नेमकी ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.