मुंडीकोटा येथे पोषण आहार कार्यक्रमाचा शुभारंभ

0
30

तिरोडा,दि.02ः-एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तिरोडाच्यावतीने 1 सप्टेंबरला राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमानिमित्ताने विविध कार्यक्रमाचा शुभारंभ मुंडीकोटा येथे ग्रामपंचायत सरपंच अतिलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून जिल्हा महिला बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर,पंचायत समिती सभापती कुंताताई पटले,बालविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी,उपसरपंच खुशाल कटरे,प्राचार्य श्री नागदेव,मालन्ताई साठवणे,रेखाबाई पारधी,मुख्याध्यापक सोनवणे,सुरेंद्र भांडारकर,राजू चामट,साजन दादुरिया व गावातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी केले. मंचावर उपस्थित सर्व अतिथीना शिक्षिका,अंगणवाडी सेविका व किशोरवयीन मुली यांना पोषण महिन्याचे महत्व समजावून सांगितले.यावेळी सही पोषण – देश रोशन यानुसार पोषण आहार प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा भांडारकर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये पोषण पोषण संदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्व अंगणवाडी सेविका,अशा सेविका यांनी संपूर्ण महिनाभर ठरविलेल्या वेळापत्रकानुसार कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंडीकोटा येथील अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.