ग्रा.प.सदस्याचा विरोधात ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन

0
18

सतिश कोसरकर

नवेगावबांध,दि.16-स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयात  ग्रामसेवक पि.एस.समरित हे शासकीय काम करित असताना ग्राम पंचायत सदस्य संजय उजवणे, ऋषी पुस्तोडे व घनश्याम बोरकर यांनी ग्रामविकाला मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मराठी अनुवाद करून  सांगा असा वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाला घेऊन ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलन अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरु केल्याने ग्रामपंचायतीच्या कामावर परिणाम जाणवू लागला आहे.

या सदस्यांनी तू जर आम्हाला लिहून दिले नाही तर तुला येथे काम करू देणार नाही. जर जास्ती करशील तर कार्यालयाच्या बाहेर हाकलून देऊ आणि यानंतर सरपंचाला कार्यालयात येऊ दिलेस तर तुलाही मारून बाहेर काढू, अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचार्‍याला जीवे मारण्याची धमकी देणे, लोकसेवक पदाचा गैरवापर केल्याने याचे फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात येऊन जोपर्यंत सदस्यावर कार्यवाही होणार नाही, तोपर्यंत तालुक्यात कोणताही ग्रामसेवक काम करणार नाही असा पवित्रा ग्रामसेवक संघटनेना घेतला आहे.