महसुल विभागाच्या तीन वरिष्ठ अधिक-यांच्या समन्वयाच्या अभावामुळे तहसील कार्यालय वार्य्रावर

0
43

पदोन्नतीने बदली झालेल्या रिक्त पदे भरलीच नाही

देसाईगंज दि २९- गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगरपालिका व सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देसाईगंज तहसील कार्यालय सध्या जिल्हा प्रशासनाने वाय्रावर सोडले असुन महसूल विभागाच्या तीन वरिष्ठ अधिका-यांच्या असमन्वयाचा फटका सर्व सामान्य जनतेला नाहक सहन करावा लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील महसूल विभागात कनिष्ठ लिपीक पदावरून अव्वल कारकून पदावर पदोन्नतीने मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आले. यात देसाईगंज तहसील कार्यालयातील मुख्य टेबल सांभाळणाय्रा प्रस्तुतकार व नझुल जमिन विभागातील कार्यरत कनिष्ठ लिपीक यांची अव्वल कारकून पदावर पदोन्नतीने इतरत्र बदली करण्यात आले आहे. मात्र, हे पद भरण्यात आले नाही. या पदोन्नती बदली पुर्वी देसाईगंज तहसील कार्यालयात तीन पदांचा बॅकलॉग होता. परंतु दोन कनिष्ठ लिपीक यांची अव्वल कारकून पदावर पदोन्नतीने इतरत्र बदली केल्यानंतर रिक्त पदावर जिल्हा प्रशासनाने भरना न केल्याने सध्या तरी देसाईगंज तहसील कार्यालय वाय्रावर सोडले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तहसील कार्यालय शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देत असतो. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे महसूल व नझुल जमिन असल्याने या दोन्ही विभागाकडून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळत असतो. देसाईगंज तहसील कार्यालयात सध्यास्थितीत एकुण पाच कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग असुन सर्व सामान्य जनतेचे अनेक कामे रखडली आहेत. वरिष्ठ अधिका-यांना या बाबतीत विचारना केली कि ते उडवा उडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेतात. या कर्मचारी बॅकलॉगचा फटका मात्र सर्व सामान्य जनतेला नाहक सहन करावा लागत आहे.

वरिष्ठ अधिका-यांमध्ये समन्वयाचा अभाव

देसाईगंज तहसील कार्यालयात अनेक पदांचा अनुशेष असताना सर्व सामान्य जनतेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असुन संबंधित अधिकारी वरिष्ठांना न कळविता वेळ काढू धोरण अवलंबिले आहे. मात्र महसूल विभागातील तिन्ही वरिष्ठ अधिका-यांची एकमेकांशी पटत नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या समन्वयाच्या अभावामुळे तालुक्यातील जनतेला वेळेवर काम होत नसल्याने हेलपाटे घालावे लागत आहेत..