सोनी येथील अवैध दारुचे धंदे बंद करा ठाणेदारांना निवेदन

0
57

गोरेगाव,दि.01ः- तालुक्यातील सोनी येथे मोठ्याप्रमाणात अवैधरित्या देशीविदेशी दारुचा व्यवसाय फोपावला असून सदर अवैध दारु व्यवसायावर अंकुश लावून बंद करण्याची मागणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन मेहत्रे यांच्याकडे निवेदनातून सोनीच्या नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष क्रिष्णा बोपचे,पोलिस पाटील आशा बोपचे,सरपंच हेमेश्वरी हरिणखेडे,उपसरपंच झनकलाल चव्हाण,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष काशीराम पटलेसह आदीनी केली आहे.