भटक्या जमातीच्या लोकांना आजही पिण्याचे पाणी देण्यास नकार

0
113

**सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीबिर्री येथील प्रकार*
सडक अर्जुनी::--तालुक्यातील सिंदीबिर्री गटग्रामपंचायत अंतर्गत ग्राम बिर्री येथे भटक्या जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. बिर्री येथील पाणी पुरवठा योजनेंतर्गत नळाचे पाणी मागिल सात दिवसांपासून बंद आहे.तयामुळे येथील नागरिकांना बोअरवेलचे दुषित पाणी प्यावे लागत आहे.ग्रामपंचायत प्रशासन व पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्षामुळे जलजीवन व शुध्द पाणी पुरवठा योजना ही नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित ठेवित आहे.ग्रांमपंचायत पदाधिकारी सांगतात की, नागरिकांनी घर टॅक्स न भरल्याने सदर योजना बंद केली आहे.वास्तविक कोविड-१९ कोरोना काळात लोकांना स्वत:चे घर सांभाळणे कठीण झाले होते.त्यामुळे घर टॅक्स भरू शकले नाही.बिर्री येथे भटक्या जमातीचे २० घरांचे कुटुंब असून त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. इतर सधन लोकांसारखे घरी विहीर किंवा बोअरवेल खोदू शकत नाही.त्यामुळे दुषित पाण्याचा वापर करीत आहेत.गावातील सधन लोकांकडे बोअरवेल असून या भटक्या जमातीच्या लोकांना पाणी भरू देत नाही.आजही भटक्या जमातीच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.