कारंजा येथील अंबिका वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती उत्साहात

0
25

गोंदिया,दि.02ः- तालुक्यातील अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालयाचे प्राचार्य डी एम.राऊत होते.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुुणे म्हणून से.नि.कनिष्ठ लेखाधिकारी फनेंद्र हरिणखेडे,सामाजिक कार्यकर्ते श्रीराम रहमतकार उपस्थितीत होते.कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना श्री.हरिणखेडे यांनी वाचनालायाची स्थापना स्व.श्रधेय लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या विचारांचा प्रभावाने संस्थेचे संस्थापक सचिव  टेकचंद बलभद्रे यांनी केल्याचे सांगत वाचनालयाच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण होत असल्याचे विचार मांडले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एम.राऊत यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत वाचनालयात दरदिवशी अभ्यास करणाऱ्या  व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी अशी सूचना केली. कार्यक्रमाला सरपंच धनवंताबाई उपराडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच पूर्व.माधयमिक शाळा कारंजाचे मुख्यधयापक‌, गावातील सर्व गणमान्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव हरडे यांनी केले.तसेच आभार लंस्थेचे सदस्य मारोती भिमटे यांनी मानले.कार्यक्रमात सर्व वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.