गोरेगाव येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करा – आ.रहांगडाले

0
27

तिरोडा:- महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी विकासकामांवर भर देत गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली असता विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. सदर योजना तातडीने सुरु करण्यासाठी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधीकारीच्या दालनात बैठक बोलाविली.यामध्ये प्रामुख्याने नगर परिषद तिरोडा येथील म.फुले वार्ड येथील अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करणे, नगर पंचायत गोरेगाव येथील शास्कीय जागेवर अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करणे,श्रीरामपूर पुनर्वसन येथील पट्टे नियमाकुल करणे, नगर पंचायत गोरेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे DPR तय्यार करणे, अनु.जाती व अन्य परंपरागत वननिवासीधारकांना वनहक्क दावे मंजूर करणे, निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी Catchment Treatment Plant तय्यार करून सुप्रमाकरिता सादर करणे आदी महत्वपूर्ण विषयावर आढावा घेण्यात आले. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे,उपवनसंरक्षक कुलराजसिंग, मजीप्राचे कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता,तिरोडा व गोरेगावचे तहसीलदार,माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार उपस्थित होते.