बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

0
7

धानोरा, दि.२७:: पेपर चांगले गेले नाही म्हणून  बारावीतील एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रुपाली शंकरलाल मार्गिया(१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

रुपालीचे वडील शंकरलाल मार्गिया हे एटापल्ली तालुक्यातील येमली येथे शिक्षक आहेत, तर आजोबा धानोरा पंचायत समितीचे सदस्य आहेत. वडील येमली येथे वास्तव्य करतात. रुपाली ही तिची आई व आजोबासह धानोरा येथील विद्यानगरात राहत होती. वडिलांची प्रकृती बरी नसल्याने आई येमली येथे गेली होती, तर आजोबा जयलाल मार्गिया हे नागपूरला गेले होते. आज जयलाल मार्गिया हे सकाळी घरी परतले. दार उघडून बघताच स्वयंपाकखोलीत रुपाली गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. तिने एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्यात प्रकृती बरी नसल्याने व गणिताचा पेपर बिघडल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले.