शेतात वीज, रस्ता, पाणी देण्यास शासन कटिबद्ध – चंद्रशेखर बावनकुळे

0
16

नागपूर दि..२७: प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वीज, शेतीत जाण्यासाठी पांदण रस्ता, 24 तास पाणी आणि शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार या चार गोष्टींसाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरखेड तालुक्यातील बेलोना येथे दिली. या समाधान शिबिरात आणि त्यापूर्वी आलेल्या 2532 तक्रारीपैंकी 2364 तक्रारी लगेच निकाली निघाल्या असून 168 तक्रारींवर कारवाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराजस्व अभियानाअंतर्गत बेलोना जिल्हा परिषद सर्कल येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आमदार डॉ.आशिष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, पंचायत समिती सभापती राजेंद्र हरणे, सरपंच कीर्ती पराते आदी उपस्थित होते.