लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे क्रीडा संकुल शोभेच्या वास्तू : बोपचे

0
33

गोरेगाव- हिरडामाली येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी बोपचे यांनी बोलतांना सांगितले की, क्रीडा प्रतिभा गावातच वास्तव्य करते. त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी देण्याची गरज आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाने ग्रामीण भागातील युवकांची क्रीडा प्रतिभा वाढावी व खेळात जास्तीत जास्त सहभाग वाढावा व खेळाला चालना मिळावी करिता क्रीडा संकुल उपलब्ध करून दिले. मात्र क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे क्रीडा संकुल फक्त शोभेच्या वास्तू बनलेली असून ओसाड पडलेले आहे. यात कालानुरूप बदलासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी रविकांत बोपचे यांच्यासह माजी आमदार हेमंत पटले, माजी सभापती पि.जी. कटरे, देवचंद कुंभलकर, रुपचंद प्रधान, किशोर गौतम, विष्णु चक्रवर्ती, लोकेश कटरे आदिंसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.गोंदिया : दरवर्षीप्रमाणे कार्तिका पौर्णिमानिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात ८ व ९ नोव्हेंबर रोजी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय जत्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह लोककला संस्कृतीतील शाहिर व दंडार मुकाबलाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाविक व लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरणीघाट येथे आयोजित जत्रेचे शुभारंभ सकाळी ११ वाजता कृउबास सभापती चुन्नी बेंद्रे यांच्या हस्ते मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमात धनलाल ठाकरेसह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे रात्री शाहिर होलीराम बिरनवार व गवराज पारधी यांच्यात शाहिरी मुकाबलाचे आयोजन करण्यात आले आहे. तर ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मॉ गंगा आरती कार्यक्रम आयोजित आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रफुल पटेल, मध्यप्रदेशचे आमदार हिना कावरे व माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ९ वाजता निरंजन दंडार मंडळ व उमंग दंडार मंडळ यांच्यात मुकाबला होणार आहे. याप्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.