मुलीला आत्महत्येस प्रवृत करणार्‍याला कठोर शिक्षा द्या

0
30

सडक अर्जुनी-तालुक्यातील श्रीरामनगर येथील निशा रतिराम लंजे वय १६ वर्षे या मुलीला आरोपी पुंडलिक टिकाराम गहाणे वय ४५ वर्षे यांनी मुलीच्या घरी श्रीरामनगर येथे जाऊन मुलीसोबत जबरदस्तीकरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलाच्या असे आरोप कुटुंबियांनी पत्रपरिषदेत केला आहे.
श्रीरामनगर येथे त्यांच्या राहत्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत मृत मुलीची आई रिता रतीराम लंजे यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही कुटुंबासह मागिल १0 वर्षांपासून श्रीरामनगर येथे वास्तव्य करीत असून कंपनीच्या व इतर नाटकात काम करते. आरोपी पुंडलिक टिकाराम गहाणे यांच्या सोबत मुलीच्या आईची ओळख आहे. त्याचे नाटकाचे डेकोरेशन लावण्याचे काम आहे. त्यामुळे त्याचे श्रीरामनगर येथे दोन तीन वर्षांपासून घरी येणे जाणे होते. म्हणून त्याला घरचे लोक ओळखत होते. मागिल दोन वर्षांपासून त्याचे घेतलेल्या नाटकांमध्ये काम केले नाही म्हणून तो तिरस्कार करत होता. त्यातच ती २७ ऑक्टोबर रोजी नाटकात काम करण्यासाठी नवेगावबांध येथे गेली असता पुंडलिक टिकाराम गहाणे याने मारझोड केली व ईल शिवीगाळ केली. ३0 ऑक्टोबर रोजी नाटकाची तारीख असल्याने ती वडसाला गेली होती. दरम्यान मुलगी निशा हिचा सायं. ४.३0 वाजे सुमारास फोन आला. तिने सांगितले की, पुंडलिक टिकाराम गहाणे घरी आला होता, त्याने ईल शिवीगाळ केली व मारझोड केल्याचे सांगितले. यावर मी पुंडलिक गहाणे याला फोन करून तु माझ्या घरी कशाला गेला होतास, असे विचारले असता त्यावर त्याने ईल शब्दात शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजे दरम्यान गावातील व्यक्तीने सांगितले की, मुलगी निशा सौंदड येथील सरकारी दवाखान्यात भर्ती असून खुप गंभीर अवस्थेत आहे. यावर मी लगेच सौंदड येथे आले. काही वेळानंतर डॉक्टरांनी मुलगी मरण पावल्याचे सांगितले. आरोपीने माझ्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘तुझी माय तशीच आहे आणि तु पण तशीच आहे, तु जहर खावून मरुन जा’ असे म्हणून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे माझ्या मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत मुलीच्या आईने पत्रपरिषदेत माहिती दिली.