२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन

0
14

गोंदिया,दि.23ः जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस अधिक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. मुंबई शहर येथे आंतकवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार , तसेच निष्पाप नागरिक व विदेशी नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता दिनांक २६/११/२०२२ रोजी वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत  पोलीस मुख्यालय गोंदिया ,उप-मुख्यालय देवरी,पोलीस स्टेशन आमगाव व पोलीस स्टेशन तिरोडा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याकरिता सर्व तांत्रिक उपकरणे, डॉक्टर, सहाय्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. रक्तदान देणाऱ्या पोलीस अधिकारी / अंमलदार, प्रतिष्ठीत व्यक्ति, तरुण तरुणी मंडळी व नागरिक यांना जर रक्ताची गरज भासली तर त्यांच्याकडुन एक वर्षाचे वैध डोनर कार्ड देण्यात येणार असुन एक वर्षापर्यंत रक्त पुरविण्यात येणार आहे.पोलीस अधिकारी / अंमलदार प्रतिष्ठीत व्यक्ति, संपादक,तरुण तरुणी मंडळी व नागरिकांचे कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास दिलेल्या एक वर्षाचे वैध डोनर कार्ड मध्ये सवलतीच्या दराने रक्त पुरविण्यात येणार आहे. रक्तदान शिबीराच्या दिवशी रक्तदान दात्यास हल्दीराम फरसाण, स्विट, गिफ्ट ,टिफीन बॉक्स व सर्टिफिकेट देणार आहेत.गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होणार आहेत. तथापि लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता प्रतिष्ठीत व्यक्ति, तरुण तरुणी मंडळी व इतर नागरिक यांनी मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होवुन सहकार्य करावे असे गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.