स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी “हल्लाबोल आंदोलन”

0
17

गोंदिया:- विदर्भावर सतत होत असलेल्या अन्याया विरोधात तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 19 डिसेंबर ला विधान मंडळावर “हल्लाबोल आंदोलन” या विषयी 14 डिसेंबरला विदर्भवाद्यांची आवश्यक चर्चा बैठकीचे आयोजन जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ राज्य आंदोलन समिति गोंदियाच्या वतीने स्थानिक विश्रामगृहात करण्यात आले. या बैठकीत जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे यांच्या सह शहर प्रमुख वसंत गवळी, भोजराज ठाकरे, गुलाबराव गेडाम, एस पी बोरकर, पी एन तल्हार, आय एन वंजारी, अशोक उके, सुंदरलाल लिल्हारे व गोंदिया जिल्ह्यातील अन्य विदर्भ प्रेमी सहकारी बंधु हजर होते. 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजता गोंदियातुन मोर्चा महाराष्ट्र एक्सप्रेसने जाणार असून 19 डिसेंबरला नागपुरात होत असलेल्या आंदोलन मोर्च्यात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या हल्लाबोल आंदोलनाची सुरवात १९ डिसेंबरला दुपारी १ वाजता नागपुरातील यशवंत स्टेडीयम वरून होणार असून पंचशील चौक – झांशी राणी चौक – व्हेरायटी चौक – विधान भवन या मार्गाने आगेकूच करणार आहे. विदर्भातील 11 ही जिल्ह्यात या आंदोलनाला विविध पक्ष व संघटना द्वारे मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तात्काळ व्हावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांना 24 तास तास वीज देण्यात यावी. वैधानिक विकास मंडळ नको–विदर्भ राज्याच हवे. विदर्भातील 11 ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अन्नधन्न्यावरील GST तात्काळ रद्द करावा, बल्लारपूर – सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणी करण्यात येणार आहे.