जागतीक महिला दिनाच्या आदल्यारात्री महिलेला मारहाण

0
8
 

गोंदिया -जागतीक महिला दिनाच्या आदल्या रात्री देवरी येथील गोंडवाना नगरात एका पोलिसाने एका महिलेला मारझोड केल्याची घटना सोमवारी ६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. यात जखमी महिलेचे नाव शालीनी आनंद कोरेटी (४५) रा. गोंडवाना नगर देवरी असे असून हिच्या घरी देवरी पोलिस उपमुख्यालयात कार्यरत पोलिस कर्मचारी नरेंद्र टेकाम हा भाड्याने राहतो. महिना पूर्ण झाल्याने सदर महिला आपल्या मुला सोबत आपल्या भाड्याचे पैसे मागण्याकरिता ६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ला पोलीस कर्मचारी कडे गेली असता. तिथे तिच्याशी वाद घालून तिला मारझोड केली. नंतर त्या महिलेला गंभीर अवस्थेत प्रथम देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.