जिल्ह्यातील लक्ष्मी गौशाला ‘चेंज मेकर’ पुरस्काराने सन्मानित

0
26

गोंदिया – जिल्ह्यातील कृषी व गौशाला संदर्भात कार्यरत असलेल्या लक्ष्मी गौशाला ट्रस्ट चुटिया ला नागपूर येथे आयोजित ९ व्या ‘Annual ग्लोबल नागपूर समिट २०२२’ या कार्यक्रमांत ‘चेंज मेकर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार लक्ष्मी गौशाला ट्रस्टचे संचालक ऋषीकुमार टेंभरे व प्रीती टेंभरे यांनी स्वीकारला.
सदर कार्यक्रमात लक्ष्मी गौशाला चुटियाच्या वतीने ग्रामीण अर्थव्यवस्थाला मजबूत करण्यासंदर्भात “हर गाव मे भारत बसता हैं” यावर सादरीकरण करण्यात आले होते. या आधारावर लक्ष्मी गौशालाला “चेंज मेकर” पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार आयआयएम नागपूरचे डायरेक्टर डॉ. भीमराया मेत्री, पद्मश्री कल्पना सरोज, डॉ. ओ. पी. गोयल यांच्या हस्ते गौशाला चे संचालक ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रिती टेंभरे यांनी स्वीकारला. लक्ष्मी गौशालाच्या माध्यमातून महिलांच्या सहकार्याने मागील काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गोबर पासून राखी तयार करण्याचे काम होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर ही घेण्यात आली आहे.