जुन्या पेंशनकरीता मुख्यंत्र्यांना कर्मचारी संघटनेचे निवेदन

0
24

गोंदिया,दि.02ः-महाराष्ट्रातील कर्मचारी ज्यांना 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू करण्यात आली.परंतु बेभरोसा आणि वाऱ्यावर असणारे पैश्याची भीती महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांना असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एनपीएसला विरोध करत असल्यामुळे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या गोंदिया वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी निवेदन पाठवण्यात आले.
कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता अतिशय वाईट अशा प्रकारची एनपीएस योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारून दिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात या योजने विरुद्ध अतिशय आक्रोश असल्याचे दिसून येत आहे.अशा वाईट योजनेमध्ये शासन व कर्मचारी या दोघांचेही नुकसान असल्यामुळे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेने निवेदना मार्फत त्वरित एन पी एस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याची मागणी निवेदनामार्फत केली आहे. 2005 नंतरच्या सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.याप्रसंगी संघटनेचे महेश राठोड (अध्यक्ष,) प्रदीप राठोड (सचिव), विलास राठोड, संजय राठोड,किशोर राठोड,आकाश चव्हाण अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.