जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन जिल्हा परिषद कार्यालयात साजरा

0
17

गोंदिया-जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन ३0 जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, प्रमुख उपस्थिति जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती इंजि. यशवंत गणवीर, वित्त व बांधकाम सभापती संजय टेंभरे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ (धुर्वे),गोंदिया पंचायत समिती सदस्य पटले मँडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. रोशन राऊत उपस्थित होते.
सदर दिवसाच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने काही दुर्लक्षित आजार जसे प्रामुख्याने हत्तीरोग, कुष्ठरोग, रँबीज व इतर संसर्गजन्य आजार आपल्या परिसरात आढळतात परंतु आपण ते दुर्लक्षित करत असतो. त्याचे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास तो कमी होण्यास मदत होते व तो इतर समूहाला पसरू शकत नाही याची जाणीव लोकांपयर्ंत करण्याचा प्रमुख उद्देश होता.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी गोंदिया जिल्ह्यात हत्तीरोग व कुष्ठरोग प्रामुख्याने आढळतो व त्यावर माणसाने दुर्लक्षित केल्यामुळे त्याचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यामुळे लोकांमध्ये विक्रुती निर्माण होउन रुग्णाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊन रुग्णाची सामाजिक, मानसिक स्थिती खालावते. तरी शासनाच्या १0 फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारी सामुदायिक औषधोपचार मोहिमेत सर्व लोकांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक वयोमानानुसार आरोग्य कर्मचार्‍यांसमोर गोळ्या खाण्याचे आव्हान याप्रसंगी केले आहे.
अनिल पाटील यांनी हत्तीरोगा पाठोपाठ कुष्ठरोग हा सुद्धा प्राथमिक स्तरावर ओळखता गेल्यास त्यावर येणारी विकृती कमी करता येऊ शकते तरी कुष्ठरोग संसर्गिक स्वरूपात रोखण्यासाठी शासनाची एम.डी.टी. औषधोपचार नियमित स्वरूपात खाण्याचे आव्हान याप्रसंगी केले तसेच ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेची व्याप्ती गावोगावी करण्यात येण्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी शासनाच्या औषधोपचार व जनजागृती मोहीम राबवताना गाव पातळीवर ग्रामसभेच्या व दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येऊन लोकसहभागातून चळवळ निर्माण करण्यात यावी तसेच अधिकारी व पदाधिकारी यांनी सर्व विभागाच्या एकत्रित सहाय्याने दुर्लक्षित आजारीवर नियंत्रित करता येऊ शकत असल्याची माहिती यावेळी सांगितले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम व जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधी आजार दिनानिमित्त शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले. त्यात आदर्श कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल फुलचुर गोंदिया चे विद्यार्थि श्रेया कोरे, दिया बिसेन, राशी पंधरे, विनय पाखमोडे, मुस्कान ठाकरे, भारती बघेले, सावी मेंढे, जिज्ञासा आगासे, चिन्मय बावनथडे यां विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधी आजाराची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद कार्यालयाला रंगीत रोषणाई करण्यात आली होती.कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा कुष्ठरोग विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आशिश बल्ले, प्रास्ताविक डॉ. नितीन वानखेडे तर आभार प्रदर्शन डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले. कार्यक्र्माची जनजाग्रुती जिल्हा आय.ई.सि. अधिकारी प्रशांत खरात यांनी केले.