डॉ. आंबेडकर जयंतीला गोंदियात येणार अरुंधती रॉय?

0
22

जयंतीच्या तय्यारीला लागले भीमसैनिक!

15 लाख खर्चाचे लक्ष्य

गोंदिया ता.9:-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या जयंतीला प्रखर वक्ता म्हणून बुकर पुरस्कार प्राप्त, राजकीय आणि मानवाधिकार कार्यकर्त्या,उपन्यासकार आणि ‘The God of small Things’च्या लेखिका सुजन्ना अरुंधती रॉय यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल संस्थेच्या सभागृहात आयोजित एका सभेत कार्यकर्त्यांनी हा ठराव मांडला, सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. सामाजिक जयंतीचे अध्यक्ष नानाजी शेंडे हे होते. दरम्यान कार्यक्रमाची रूपरेखा तय्यार करण्यात आली.याप्रसंगी जयंतीच्या कलेकशन साठी आजपासून तय्यारी करणे, तसेच वक्ता बोलविणे , सत्कार मूर्तीच्या शोध घेणे आणि संगितमय कार्यक्रमाचे आयोजन यावर जोरदार चर्चा करण्यात आली. डॉ. आंबेडकर जयंतीचे माजी अध्यक्ष ज्योतीप्रकाश गजभिये यांनी अरुंधती रॉय यांना तर पृथ्वीराज कोल्हटकर यानी, मनुवाद्यांच्या विचारधारेतून लोकशाहीची व्याख्या कशी बदलविण्यात आली याचे सिद्धांत मांडणारे वक्ते ऍड. राजेंद्र प्रसाद यादव यांच्या नावाचा ठराव मांडला. तसेच यावर्षात जयंतीच्या वतीने सम्राट अशोक,छ. शिवाजी महाराज आणि बहुजन समाजात जन्मलेल्या महापुरुषांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना सर्वांच्या सहकार्याने संमती दर्शवून विचार करण्याचा मानस आहे असे अध्यक्ष श्री शेंडे यांनी बोलून दाखविले . दरम्यान तसे अधिकार श्री शेंडे यांना देण्यात आले.यावेळी मोठया संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. बाबासाहेबांच्या मागील जयंतीमध्ये सुमारे नऊ लक्ष रुपयांची उलाढाल झाली असून यावेळी सुमारे 15 लाख रुपये कलेकशन करण्याचा लक्ष्य कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. यावेळी माजी अध्यक्ष सविताताई उके,विलास वासनिक, सुशील गणवीर, अरविंद साखरे, तर कार्यकर्ते मिलिंद पाणतावने, रोशन कावळे, गेंदलाल तिरपुडे, विपुल उके ,जोगेंद्र गजभिये,
श्री भेलावे,डॉ कोटांगले, श्रीमती वंदना श्यामकुवर यांनीही विचार मांडले.सभेचे संचालन करून सुनील मेश्राम यांनी आभार मानले.