राज्यातील विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरणानुसार मराठी भाषेत उच्चतंत्र शिक्षण देणार-उपमुख्यमंत्री फडणवीस

0
46

स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी सुवर्ण पदकाने सम्मानित

गोंदिया(खेमेंद्र कटरे) :देशाच्या व समाजाच्या विकासात तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात स्व.मनोहरभाईंनी केलेले कार्य अतुलनिय असे असून त्या काळात ठेवलेली शिक्षणाची लावलेले वृक्ष आज गोंदिया-भंड़ारा जिल्ह्यात वटवृक्षाच्या स्वरुपात बहरल्यानेच आज शिक्षणाची सोय त्याकाळी नसलेल्या जिल्ह्यामध्ये शिक्षित पिढी बघावयास मिळत आहे.शिक्षणाच्या चांगल्या सोयीमुळेच आज प्राविण्य श्रेणीत येणार्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार सुवर्णपदक देऊन करतोय हे खरे मनोहरभाईंच्या कार्याचे फळ आहे.नवीन शिक्षण धोरणामुळे जागतिक शिक्षणाची दारे उघडली गेली आहे.राज्य सरकार सर्व वैद्यकीय अभियांभिकीसह उच्चतंत्र शिक्षणाचे अभ्यासक्रम मराठी भाषेत सुरु करण्याचे कार्य येत्या काळात करणार आहे.देशाच्या मानव संशाधनात गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचे योगदान त्यामुळे मोठे असणार आहे.राज्यात उद्योग व्यवसायात सर्वाधिक निवेश कर्ते असलेले सज्जनजी विदर्भातही निवेश करतील अशी अपेक्षा आहे.गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील लोहखनीज वाहतूक करुन नव्हे तर त्याच ठिकाणी उपयोगी आणून स्टील उद्योग सुरू करण्यासाठी करार झाले.सोबतच इको सिस्टममुळे तिथे उद्योगाला चालना मिळणार आहे.पुर्व विदर्भात धानाचे शेती अधिक असल्याने या धानाच्या उत्पादनाकरीता कॉरिडॉर तयार करण्याची योजना असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सोबतच आपल्या येथे आल्याने राजनितीक क्षेत्रात चर्चांनाही उधाण आले असणारच असे म्हणत हम आये तो चर्चा होती रहेगी, दूर तक भी जायेगी.लेकीन महाराष्ट्र मे हम राजनितीत लोग चुनाव के वक्त सिर्फ राजनिती करते है,बाकी वक्त तो हम सब दोस्त के रुप मे ही एकदुसरे के यहा आया जाया करते है.इसलिये हमारे आने की चर्चा औऱ भाईजी के मिलाप की चर्चा यहा ही नही तो वह तो उपर तक भी चलेगी असे म्हणत राजनिती को अलग रखकर व्यक्तीगत संपर्क से हमारे विचार व्यक्त करते रहते है.

ते गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता व शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंती निमित्त गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमात उदघाटक म्हणून येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

सुवर्णपदक वितरण समारंभात कार्यक्रमांचे उद्घाटक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांच्या हस्ते स्व.मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते.यावेळी मंचावर विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ,प्रदिप शाह,आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय रहागंडाले,आमदार सहसराम कोरेटे,आमदार मनोहर चंद्रिकापूरे,आमदार राजू कारेमोरे,आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार डाॅ.परिणय फुके,माजी खासदार डॉ खुशाल बोपचे,माजी आमदार नाना पंचबुध्दे,हेमंत पटले,राजकुमार बडोले,खोमेश्वर रहागडाले,रमेश कुथे,गोपालदास अग्रवा,बंडुभाऊ सावरबांधे,प्रकाश गजभिये,सेवक वाघाये,मधुकर कुकडे,केशव मानकर,दिलीप बनसोड,भेरसिंह नागपुरे,अनिल बावनकर,जि.प.अध्यक्ष पकंज रहांगडाले,उपाध्यक्ष यशवंत गणविर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, गोंदिया शिक्षण संस्था अध्यक्ष श्रीमती वर्षाताई पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल,पूर्णा पटेल, प्रजय पटेल, निखिल जैन व प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्तविकात खासदार प्रफुल पटेल म्हणाले आपण विदर्भाच्या विकासाकरीता पक्षभेद करुन काम करण्याची गरज आहे.देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीकोन ठेवणारे राज्यातील नेते आहेत.उद्योगपतीनी या जिलह्याच्या विकासाकरीता सहकार्य करण्याची गरज आहे.गोंदिया भंडाऱातही जिंदलजी आपण निवेश करावे अशी विनंती केली.यावेळी बोलतांना सज्जन जिंदल म्हणाले की १६ वर्षाच्या वयात येऊन मनोहरभाईनी गोंदियाला आपले स्थान बनवले ज्यांनी शिक्षणाची सोय गावखेड्यात केली ते अतुलनिय कार्य आहे.विदर्भात गौणखनिजाची उपलब्धता आहे आम्ही नक्की येथे काम करण्याकरीता प्रयत्न करु.प्रगतीशील जिल्हा गोंदियाला बनवण्याकरीता सहकार्य करु असे विचार त्यांनी व्यक्त केले.विजय दर्डा म्हणाले की देवेंद्रजी कुणाला तरी ते न्यायला आले आहेत ते जेथे जातात तिथून कुणाला तरी नेतात असे देवेंद्रजी आहेत.

सुवर्ण पदकाने सम्मानित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचे एस.एस.सी.मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त गुजराती नेशनल हायस्कुल, गोंदियाची कु. नक्षत्रा होमेश्वर बावनकर व शारदा कॉन्व्हेंट हाईस्कूल, गोंदियाची वेदी भुवनकुमार बिसेन, एच.एस.एस.सी.मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एस. एम.पटेल ज्युनियर कॉलेज, गोंदियाची कु.आस्था अनिलकुमार बिसेन, गोंदिया जिल्ह्यात एच.एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त सरस्वती ज्युनियर कॉलेज अर्जुनी-मोरगावचा अमन रमेशचंद्र अग्रवाल, गोंदिया जिल्ह्यात बी.ए. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एस.पी. कॉलेज, दासगावचा अलदिप चंद्रभान डहाट, गोंदिया जिल्ह्यात बी.कॉम. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त एन.एम.डी. कॉलेज, गोंदियाची कु.प्रगती रमेश चटवानी, गोंदिया जिल्ह्यात बी.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त इंद्राबेन हरिहरभाई पटेल साईन्स कॉलेज, गोरेगावची कु.काजल आनंदराव चौहान, बी. फार्मसी मध्ये मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ़ फार्मसी, गोंदियाचा ओम धरमश्याम पटले व एस. एस. सी. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त वैनगंगा विद्यालय पवनीची कु. तन्वी दिपक तलमले, एच.एस.एस.सी भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त एस. जी. वी. डिफेन्स ज्युनियर कॉलेज, शहापुरचा नमीत मनिष व्यवहारे, बी.ए. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण जे. एम. पटेल कॉलेज, भंडाराचा शुभम अशोक ठोंबरे, बी.कॉम. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा चा मिहीर केशव चकोले, बी.एससी. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त जे. एम. पटेल कॉलेज, भंडारा ची कु. लिन्टा टॉमसन, बी. ई. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ़ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, भंडाराचा प्रशांत भरतराम तरोने यांचा सत्कार करण्यात आला.
आयोजनाकरीता स्व. मनोहरभाई पटेल स्मृति समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्थेने सहकार्य केले. संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व आशावरी देशपांडे यांनी केले.ऱाष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.