आ.विजय रहांगडालेंकडून तिरोडा येथे मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन

0
24

तिरोडा:- मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे नागरिकांना मोफत आरोग्यविषयक कॅम्पचे आयोजन होवू शकले नसल्यामुळे यावर्षी आरोग्य तपासणीकरिता दिनांक ११ व १२ डिसेम्बर २०२३ रोजी आरोग्य महाशिबिराचे आयोजन तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले आहे. या शिबिरामध्ये हृदय रोग, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, अस्थीरोग, त्वचारोग, नेत्ररोग, मानसिकरोग, मुत्ररोग, न्यूरोसर्जन, बालरोग, नाक कान गला, व इतर सर्वे प्रकारच्या आजाराची तपासणी व उपचार करण्यात येणार असून आवश्यक रुग्णांची एक्स-रे, रक्त तपासणी, सोनोग्राफी, सी.टी,स्कॅन, एन्जोप्लास्टी, इकोकार्डीओग्राफी,गरजू रुग्णांची सर्व प्रकारची शस्त्रकीया मोफत होणार आहे. सोबतच रक्तदानशिबीर,आयुष्यमान भारत कार्ड बनविण्याची सुविधा या शिबिरामध्ये करण्यात आलेली आहे. आरोग्य महाशिबिराची सुरुवात शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ सकाळी १०.०० वाजेपासून दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तिरोडा शहरातील ११.०० कोटी मंजूर विकास कामांचे भुमिपुजन, नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच,व आशा सेविकांचा सत्कार,व सायंकाळी ५.३० वाजता तिरोडा सांस्कुतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या आरोग्य महाशिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार रहागंडाले यांनी केले आहे.