स्नेहसंमेलनामुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास : आ. चंद्रिकापुरे

0
14

बोडगावदेवी : स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळतो त्यांच्यात उत्साह निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास होतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत भाग घेऊन जीवनातील स्पर्धा परीक्षेची स्नेहसंमेलनातून सुरुवात होते. विद्यार्थी जीवन सुखी जीवन, असून त्यांना फक्त शिक्षणाची ओढ असते. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून आपल्यातील कला गुणांचा चालना द्यावी, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
अर्जुनी मोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी देवी येथे दोन दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. चंद्रिकापुरे बोलत होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी देवी येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद््घाटन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहउद्घाटक लोकपाल गाहाने तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य किशोर तरोने हे होते. प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब संग्रामे, माजी सरपंच शिरेगाव बांध, चान्नाचे सरपंच डॉ. सचिन डोंगरे, उपसरपंच मोरेश्‍वर सोनवणे, जि. प. सदस्य लायकराम भेंडारकर, चिचमलकर, लाडे, सरपंच विशाखा वालदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश ब्राह्मणकर, कुलकर्णी, हनवत बारसे, पुंडलिक बारसे, लाला तवाडे, सेवानवृत्त मुख्याध्यापक तुकाराम तरोने, अश्‍विन मेर्शाम, माधव तवाडे, संजय तवाडे, आनंदराव दोनोडे, लतीस बहेकार, गणेश ब्राह्मणकर, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे रात्रीच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले, तर ४ फेब्रुवारी २0२३ ला, बक्षिस वितरण सोहळा व संपूर्ण गावकर्‍यासह सह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलिस पाटील हनवत बारसे तर संचालन मुख्याध्यापक नागोसे, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुर्गे यांनी केले