खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल वाढदिवसानिमित्त आरोग्य निदान व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

0
21

पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय येथे कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न

गोंदिया- स्थानिक पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालयात खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय व बाहेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

या शिबिराला गोंदियाचे प्रतिष्ठित डॉ. दिपक बहेकार, डॉ रोशन कानतोडे व डॉ. लोकेश मोहबे यांच्या सह डॉ नितेश नागभीरे, डॉ अनुराग बहेकार, डॉ गार्गी बहेकार, डॉ मनीष चोखंदरे, डॉ सतीश बन्सोड, डॉ कविता भगत, डॉ सोनल अग्रवाल, डॉ. कंचन भोयर, डॉ हर्षा कानतोडे, डॉ रिचा कोडवानी, डॉ लोकेश चतुर्भुज, डॉ निकिता खापर्डे, डॉ आचल उके, डॉ तुषार सोनवाने, डॉ नीता चौधरी, डॉ दुर्गाप्रसाद नागपुरे सह त्यांच्या पथकांनी विशिष्ट सेवा प्रदान केली. यात हृदय रोग, मधुमेह, इसीजी, हड्डी रोग, स्त्री रोग, ब्लडप्रेशर, ब्रेन विकार, त्वचा रोग, पोटाचे विकार, लकवा इत्यादी रोगांची तपासणी करण्यात आली.

शिबिराला परिसरातील ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. तसेच शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड ची नोंदणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी खा.श्री प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, निखिल जैन, मनोहर वालदे, प्राचार्य डॉ आर एल निकोसे, आशा पाटील, सुशीला भालेराव, सुनील भालेराव, विनीत सहारे, रफिक खान, केतन तुरकर, नागो बन्सोड, प्रा.एस आर पाटील, प्रा.मीनाक्षी कटरे, प्रा.विनोद गेडाम, करण टेकाम, आरजू मेश्राम ,हर्षवर्धन मेश्राम, रौनक ठाकूर, मंगेश रंगारी, श्रेयश खोब्रागडे, शुभम कोल्हटकर, एजाज शेख, आंनद मकवाना, आशिष सहारे, बिज्जू भैसारे, नौशान अली, महेंद्र बघेले, अनुप परमार, वैशाली बघेले, तिलक भांडारकर, शरद पाध्ये कमलेश डहाके, शैलेश गुप्ता, वासुदेव मेश्राम, विनोद वलके, एफ दखने, देवेंद्र वासनिक, चंद्रशेखर भालेराव, सोनल मेश्राम, सीमा भालेराव, सचिन चौरे, प्रफुल नकाशे, दुलीचंद मेश्राम दीक्षा वासनिक, वैद्यकीय चमू, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सहित बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.