लाखांदूर नगरपंचायतच्या तीन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडले

0
26

लाखांदूर: प्लॉटच्या अकृषक नाहरकत प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर नगरपंचायतच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींना 1 लाख 10 हजार रुपयांची
लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. यात स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड, कनिष्ठ लिपिक विजय राजेश्वर करंडेकर, खासगी वाहन चालक मुखारण लक्ष्मण देसाई यांचा समावेश आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना लाखांदूर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.लाखांदूर येथील रहिवाशी असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार एसीबीने ही कारवाई केली.फिर्यादीच्या शेतीची मोक्का पाहणी करून विकास आणि छाननी शुल्क पावती देण्याकरीता तसेच रेखांकन मंजुरी करीता अंतिम शिफारस पुढे पाठविण्याकरीता लाच मागितली होती.आरोपींनी प्रमाणपत्र देण्याचा मोबदला म्हणून 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. स्वतःच्याच जमिनीवर बांधकामासाठी परवानगी देताना केवळ पैशासाठी त्रास देऊन तीन वर्षापासून आरोपींनी प्रकरण प्रलंबित ठेवले होते.