छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करावे- माजी सभापती उमाकांत ढेंगे

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.20ः- छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे तसेच जाणता राजा म्हणून नाव लौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील एक तरी गुण आत्मसात करून आचरण केल्यास मानवी जीवन नक्कीच सुखकर होईल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सभापती उमाकांत ढेंगे यांनी केले. ते इटखेडा येथील बाजार चौकाच्या सभागृहात जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटना यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी इंद्रदास झिलपे होते.प्रबोधनकार शिवपाल फुंडे,सरपंच सौ आशा झिलपे, उपसरपंच आशिर्वाद लांडगे, ग्रा प स रमेश कुंभरे,ग्रा प सदस्य संजय कांबळी,सौ उज्वला गोंडाणे, सेवानिवृत्त प्राचार्य केशव भावे सेवानिवृत्त प्रार्चाय यादव चांदेवार, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष सुभाष देशमुख, माजी उपसरपंच वासुदेव ऊके, माजी ग्रा प सदस्य चेतन शेंडे माजी सरपंच लोचन चांदेवार, सम्रुदी पाणी वापर सोसायटी अध्यक्ष राकेश शेंडे, गिरीधर नागपुरे, कैलास कावळे, ताराचंद कुंभरे, विलास भावे, देवराव कोड्डे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दत्तकुमार चव्हाण,पत्रकार संतोष रोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते, यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य यादव चांदेवार केशव भावे व इतर मान्यवरांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींचे अनावरण करण्यात आले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन राजेश लोणारे तर आभार प्रदर्शन वलय कुमार चव्हाण यांनी केले,