अंगणवाडी कर्मचारी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासुन संपावर

0
24

गोंदिया,दि.20ः- जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ प्रेणीत अंगणवाडी कर्मचारी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासुन संपावर गेल्या आहेत. संघटनेच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य स्तरावरील मागण्यांचे संपाचे निवेदन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे यांचे नेतूत्वात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष कु.पंचशीला मेश्राम, कोषाध्यक्ष मीरा मेश्राम, सरचिटणीस रिता शहारे, अनिता काठाने, चंद्रकला रहांगडाले, निर्मला भोयर, विद्या रंगारी, उषा वैद्य, कीर्ती गुलक्षे, विना खोटेले, लता बोरकर, सुनीता ब्राह्मणकर, गीता शरणागत, योगेश्वरी पारधी,पुलवंता कटरे, भोजलता बघेले, सुनीता लेदे, लता तुरकर उपस्थित होत्या.