राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम रॅकिंगमध्ये गोंदिया राज्यात पहिला

0
28

गोंदिया,दि.04- गतवर्षी जून महिन्याच्या आरोग्य संचालनायाच्या प्रसिद्ध तक्ता मध्ये गोंदिया राज्यात पाचव्यास्थानी होता.मात्र सन 2022-23 वर्षां मध्ये गोंदिया जिल्ह्याने विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या रँकिंगमध्ये ऑक्टाेबंर 2022 पासुन सातत्य राखत गेल्या 5 महिन्यांपासुन राज्यात प्रथम क्रमांक राखण्यात यश मिळविले आहे.महाराष्ट्र शासन आरोग्य सेवासंचालनाया तर्फे दर महिन्याला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी अशा तीन गटांतील कामगिरीचा आढावा घेवून विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे रँकिंग करण्यात येते.
गत फेब्रुवारी महिन्याच्या कामगिरीच्या आधारे संचालकाच्या पत्रानुसार गोंदियाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. व्दितीयस्थानी नागपुर तर तृतीयस्थानी सांगली जिल्ह्याचे स्थान आहे.आरोग्य विभागाच्या कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी कौतुक केले असून पुढेही असेच सातत्य राखुन नागरिकांना दर्जेदार व गुणात्मक सेवा देण्याचे सांगितले.माता व बालकांना पाठोपाठ इतर विविध राष्ट्रिय
आरोग्य कार्यक्रमाची नागरिकांना गुणवत्ता पूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन मेहनत घेत आहे.जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेश व छत्तीसगडला लागुन आहे.जिल्ह्याला लागुन गडचिरोली व भंडारा जिल्हे आहेत.आदिवासी,नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त दुर्गम अशी जिल्ह्याची ओळख आहे.
विविध आजार बळावलेले असतात.आरोग्य कर्मचार्‍यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असताना ही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांच्या सह आरोग्य विभागाच्या चमूने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवुन हे यश संपादन केल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी सांगीतले.

जिल्हा,तालुका व प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावुन सभा घेण्यात येत असल्याने कर्मचार्‍यांच्या विविध राष्ट्रीय आरोग्य निर्देशांकावर सुधारणा करण्यावर भर देण्यात येतो.विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांबाबत महिना निहाय मासिक सभा,आभासी बैठका घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचना कामी येत असल्याचे डॉ.नितीन वानखेडे यांनी सांगीतले.
प्रभावीपणेसेवा देण्यावर भर – पुंड
आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फलीत आहे.येत्या काळात लोक सहभागातून आणखी प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर राहील.आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत सर्व माहिती पोर्टलवर विहित कालमर्यादेत भरण्यावर जोर देण्यात येणार असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी सांगीतले.