२४ मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा

0
10

गोंदिया, दि.27 : 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी 24 मार्च 1882 मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जिवाणुचा शोध लावला, त्याअनुषंगाने 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन 1962 पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविला जात आहे. अनेक रोगाचे समुळ उच्चाटन करण्यात यश आले आहे, परंतू क्षयरोगावर अद्यापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही.

        जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथे 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात डॉ.संगिता भिसे, उपसंचालक आरोग्य सेवा (क्षयरोग व कुष्ठरोग) पुणे यांच्या हस्ते डॉ.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे हे होते.

      कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, छातीरोग विशेषतज्ञ डॉ.पंकज घोलप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

       क्षयरोगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करुन प्रत्येक क्षयरुग्णाला क्षयमुक्त करण्यात यावे असे डॉ.अमरीश मोहबे यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे डॉ.कुसूमाकर घोरपडे, डॉ.नितीन वानखेडे डॉ.पंकज घोलप यांनी आपल्या मार्गदर्शनातून 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेण्यात यावे असे सांगितले.

      त्यानंतर क्षयरोग जनजागृती केटीएस सामान्य रुग्णालय येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, डॉ.करण नागपूरकर सल्लागार एसटीएसयु पुणे, डॉ.प्रविण सावंत सल्लागार एसटीएसयु पुणे, तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. तसेच फ्लेक्स डिस्प्ले करुन जिल्हाभर स्टिकर लाऊन पॉम्पलेट्चे वाटप करण्यात आले.

        त्यानंतर जयस्तंभ चौक गोंदिया येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून क्षयरोग आजाराची जनजागृती करण्यात आली व क्षयरुग्णांकरीता उपलब्ध असलेल्या सोयी सवलतीबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली. त्याचबरोबर माईकींगच्या माध्यमातून क्षयरोग आजाराची लक्षणे, निदान पध्दती, औषधोपचार, निक्षय पोषण योजना, निक्षय मित्रच्या मार्फत कोरडा आहार वाटप करण्यात येतो याबाबत जनजागृती करण्यात आली.

        क्षयरुग्णाच्या तपासणीकरीता बाह्यरुगण तपासणी व आंतररुग्ण भरतीकरीता बाह्यरुग्ण तपासणी व आंतररुग्ण भरतीकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे छातीरोग विशेष तज्ञ डॉ.पंकज घोलप यांच्यामार्फत बाह्यरुग्ण तपासणी विभागाचे कक्ष सुरु करण्यात आलेले आहे.