आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार सोहळा संपन्न

0
27

गोंदिया,दि.29 मार्च – आरोग्य विभागामार्फत 2022- 23 वर्षासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण स्व.यशवंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम, समाज कल्याण सभापती पूजाताई सेठ ,जिल्हा परिषद सदस्य सुधाताई रहांगडाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, महिला व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परिचर्या व सुश्रुषा सेवेची जननी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी गौरवण्यात येते.
आधुनिक परिचर्याचे जनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असून आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यरत पारिचारिकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार जिल्हा स्तरावर प्रदान करण्यात येतो. परिचर्या व सुश्रुषा सेवा संवर्गातील सर्व परिचारिका त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव म्हणून आरोग्य सेविका,अधिसेविका किंवा अधिपारीचारिका, आरोग्य सहाय्यिका या प्रत्येक संवर्गातून तीन पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
2022-23 वर्षात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे सर्व निर्देशकांची गुणांकन पद्धतीनुसार , शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, मागील पाच वर्षातील गोपनीय अहवाल, विविध पोर्टल नोंदी, नियमित गृहभेटी, आरोग्य संस्थेची देखभाल व स्वच्छता , राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची गुणवत्ता , सर्व रेकॉर्ड दस्तावेज अद्यावत ठेवणे , पर्यवेक्षकीय गृहभेटी , उपकेंद्र व अंगणवाडी भेटी तसेच आदिवासी व दुर्गम भागात कामाचा अनुभव ई. विविध बाबींच्या आधारे गुणांक पद्धतीने पुस्कारासाठी निवड करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
यावर्षी स्टाफ नर्स संवर्गातून प्रथम पुरस्कार जिल्हा क्षयरोग रुग्णालयाचे शीला तमखाने, द्वितीय पुरस्कार के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आस्मा नागरगोजे, तृतीय पुरस्कार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सोनल मानकर यांना देण्यात आला.
आरोग्य सेविका संवर्गातून प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाचे माधुरी टेंभुर्णेकर, उपकेंद्र इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोराचे छबीला भगत, तृतीय पुरस्कार उपकेंद्र कुडवा-1 प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूरचे प्रीती कटरे यांना या वेळी प्रदान करण्यात आला.
आरोग्य सहायिका संवर्गातून प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोराचे अर्चना कांबळे, द्वितीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्लाचे इंदिरा नंदनवार मानकरी ठरले.
सर्व पुरस्कार प्राप्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य क्षेत्रात अभिनंदन केले जात आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान, के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली खोब्रागडे तर आभार प्रर्दशन विनोद चौधरी यांनी केले. जिल्हास्तरिय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, अधिपारिचारिका  कल्याणी चौधरी व आरोग्य विस्तार अधिकारी अनिता तिरपुडे यांनी मोलाची कामगिरी केली.