महाजन यांना मंत्रिमंडळातून कमी करा

0
13

गोंदिया : तेली समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी नामदार गिरीश महाजन यांचा निषेध व्यक्त करीत त्यांना मंत्रीमंडळातून कमी करण्याची महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली. नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या सभेच्या समारोपप्रसंगी ना. महाजन यांनी तेली समाजाच्या भावना दुखविणारे विधान केले. तसेच याबाद्दल समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जयदत्त क्षिरसागर यांनी विचारणा केली असता, त्यांच्याशी उर्मट व्यवहार केला. करिता तेली समाज महासभेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन महाजन यांना मंत्रीमंडळातून कमी करण्याची मागणी करण्यात आली. महासभेचे जिल्हाध्यक्ष उमेंद्र भेलावे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना सचिव मुकुंद धुर्वे, कोषाध्यक्ष अशोक पडोळे, कार्याध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, हरीराम येळणे, सुनीता धरमशहारे, ज्योती भेलावे, कैलाश भेलावे, संजय पराडकर, खुशरंग नागफासे, भक्तराज भेलावे, राहूल मदनकर, हरीश चिंधालोरे व समाजबांधव उपस्थित होते.