छत्तीसगढमध्ये 122 नक्षलवाद्यांची शरणागती

0
8

वृत्तसंस्था

सुकमा (छत्तीसगढ) – येथील 11 महिलांसह 122 नक्षलवाद्यांनी आज (शनिवार) सुकमा येथील पोलिसांसमोर  शरणागती पत्करली आहे. 

नक्षलवाद्यांनी बस्तरचे पोलिस महानिरीक्षक एस. आर. पी. कल्लुरी, सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निरज बन्सोड, सुकमा येथील पोलिस निरीक्षक डी. श्रावण यांच्यासमोर 122 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 11 महिलांचाही समावेश आहे. बस्तर विभागात नक्षलवाद्यांनी पत्करलेली ही आतापर्यंतची ही सर्वांत मोठी शरणागती आहे.