नगरसेवक यादव यांच्यासाठी पोलिसांचा सीएसवर दबाव

0
8

गोंदिया : छेदीलाल इमलाह यांच्या खून प्रकरणात आरोप असलेल्या पंकज यादवला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. परंतु पंकज यादव यांना रक्तदाब, डोक्याचा आजार, मधुमेह व हृदयविकार असल्यामुळे त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पंकज यादव स्वस्थ आहे असे दाखविण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप पंकज यादव यांच्या पत्नी ललिता यादव यांनी केला आहे.
पंकज यादव ने न्यायालयासमोर आत्मसर्मपण केले. ६ फेब्रुवारी रोजी पीसीआर सुरु असताना पंकज यादवची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याचा सल्ला दिला. केटीएसमध्ये उपचार सुरु असताना २१ मार्च रोजी नागपूर मेडीकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नागपूर येथील सुपर हॉस्पीटलमध्ये दोन दिवस उपचार केल्यानंतर पुन्हा पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांनी केटीएस येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते व नागपूरच्या डॉक्टरांवर दबाव टाकून त्याला सुट्टी देण्यास सांगितले. त्याच दिवशी रात्री १.३0 वाजता राठोड यांनी पंकज यादवला वर्‍हांड्यात बसवून बनवाबनवीचे प्रश्न विचारु लागले. २ते ५एप्रिल दरम्यान पंकज यादवकडे कोणत्याही डॉक्टराने ढुकूंन पाहिले नाही.
भंडारा येथील तुरुंगात पाठविण्यात यावे, अशी विनंती पंकज यादवने जिल्हा शल्य चिकित्सकांना केली. परंतु त्यांच्या विनंतीकडे त्यांनी ही पाठ फिरविली. पंकज यादव यांचा उपचार सुरु असतांना रुग्णालयातून त्यांची फाईल गहाळ झाली आहे. एकीकडे रुग्णालयात ठेवण्यास नकार तर दुसरीकडे तुरुंगातही पाठविण्यास राठोड यांचा नकार असल्यामुळे पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे कळले नाहीया संदर्भात उच्च न्यायालयात याचिका टाकणार असल्याची माहिती ललिता यादव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.