गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध

0
11

गोंदिया- आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. एका लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर त्यांनी काम तरी कसे करावे, असा सूर राजकीय क्षेत्रात उमटत आहे. दरम्यान, अशा पद्धतीने एका आमदारावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे शहरवासीयांसोबत जिल्हाभरात सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे.या घटनेचे पडसाद सोमवारपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या कामकाजावर उमटतील, असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी दिला आहे.कार्यकर्ता भाजपचा असो की अन्य पक्षाचा कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल, अशी भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. अशा घटनेचे सर्मथन केले जाणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

गोंदियाच्या इतिहासातील काळा दिवस-प्रफुल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ट नेते व गोंदिया भंडाराचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेध नोंदवित भाजपमध्ये गुंडगिरीचा प्रभाव वाढत चालला आहे.आजपर्यंत गोंदियात असे घडले नाही ही घटना गोंदियाच्या इतिहासाता काळा दिवस ठरल्याची प्रतिक्रिया दिली .


शिवसेने्च्या नेत्या निलम गोरे यांनीही या घटनेच्या निषेध नोंदवित लोकप्रतिनिधीसोंबत असे होत असेल तर कायद्याचे राज्य कसे म्हणावे अशा प्रश्न उपस्थित केला आहे.
गृहराज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आमदार अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध नोंदवित हे प्रकरण वैयक्तिक मतभेदातून झाल्याचे सांगत पोलिस अधिक्षकाना लगेच कारवाईचे आदेश दिल्याचे म्हणाले.

gondia-mla-maar910-580x39

■ शहरात पहिल्यांदाच अशा पद्धतीने एखाद्या लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला आहे. अत्यंत निंदनीय अशी ही घटना असून या घटनेचा मी आणि माझ्या पक्षाकडून तिव्र निषेध व्यक्त करतो.
– राजेंद्र जैन, आमदार, गोंदिया-भंडारा

या घटनेनंतर जनप्रतिनिधींनी काम कसे करावे हे सांगणे कठीण झाले आहे. पत्रपरिषदेत आमदार गोपालदास अग्रवाल बोलत असताना अचानक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही दुर्दैवी घटना असून या घटनेचा आम्ही निषेध करतो.
– उषाताई मेंढे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
अत्यंत निंदनीय घटना

हा चुकीचा प्रकार

■ हा चुकीचा प्रकार असून आपल्या संस्कृतीच्या बाहेरची ही गोष्ट आहे. या प्रकरणाला घेऊन सोमवारी वरिष्ठांची बैठक घेऊन संबंधितांबाबत निर्णय घेतला जाईल. – हेमंत पटले, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

हा सुनियोजित कट आहे
■ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर करण्यात आलेला हा प्राणघातक हल्ला म्हणजे सुनियोजित कट होता. असा प्रकार घडने अत्यंत निंदनीय असून आम्ही या घटनेचा निषेध करतो.
– पुरूषोत्तम कटरे, जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

अत्यंत वाईट कृत्य
■ लोकशाहीत बोलण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मात्र अशा प्रकारे मारहाण करून प्रश्न सुटत नसतात. हे अत्यंत वाईट कृत्य असून यातून भाजपच्या अंगात सत्ता आली असल्याचे दिसते.
– रामरतन राऊत, माजी आमदार, देवरी

भाजप नगरसेवक शिव शर्मा यानी केलेले कृत्य निषेधाचे असून पत्रकार परिषदेत येऊन केलेली मारहाण म्हणजे नित्तिमत्ता घसरल्याचे चिन्ह असल्याचे शिक्षण सभापती पी.जी.कटरे म्हणाले.