25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी तिजेश गौतम यांची नियुक्ती

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी तिजेश गौतम यांची नियुक्ती

0
28
गोंदिया : सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्राचे अधिवेशन साईनगर शिर्डी येथे संपन्न झाले असून नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. परिषदेत गोंदिया जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत तिजेश गौतम यांची नियुक्ती गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली असून औपचारिक घोषणा प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी राज्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत केली. तिजेश गौतम गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव (पा.) ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यात यश मिळवले आहे. दरम्यान सरपंच परिषदेचे ध्येय आणि धोरणाला अनुसरून कार्य करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तिजेश गौतम यांनी सांगितले.
blank