गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात विविध विकास कामांचे भुमिपुजन

0
25

अर्जुनी मोरगाव,दि.२७-तालुक्यातील गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचे भुमिपुजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील जब्बारखेडा येथे ११.८२ लक्ष रु.किंमतीच्या नविन वर्गखोली बांधकामाचे व मौजा रांजीटोला येथे जलजीवन मिशन अंतर्गत १४.८१ लक्ष रु.च्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
सदर भुमिपुजन सोहळ्याला जब्बारखेडा येथे सरपंचा छायाताई अमले, उपसरपंच जागेश्वर मते, माजी जि.प.सदस्य रतिराम राणे, सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष संजय ईश्वार,अंगणवाडी सेविका निर्मला कोडापे, मदतनीस मिराबाई वलके,माजी सरपंच संजय खरवडे, ग्रामपंचायत सदस्य कविता कोरेटी,विरेखा वलके, सिताराम वलके, दिलिप ताराम, यशवंत ताराम,पंढरी पुडो तर रांजीटोला येथे सरपंच बळीराम टेंभुर्णे, उपसरपंच हरीचंद घरत, निखिल कोडवते,शरद शहारे, लक्ष्मी चाचेरे,ममता दोनाडकर,मंगला शेंदरे, यमुना मडावी, बाळकृष्ण ईस्कापे,राजु चाचेरे,तुलाराम बावणे, तानाजी मसराम,मनोज राउत,भारत राउत,कचरु मेश्राम, काशीनाथ मेश्राम, तेजराम सराटे, सुनिल मेश्राम, रविंद्र वाढई, बळीराम मोहनकर, गिरधारी मोहनकर,दयाराम पुसामी तथा गावकरी उपस्थित होते.