‘सनफ्लॅग’च्या प्रदूषणाने उष्णतेत वाढ

0
15

मोहाडी-सनफ्लॅग कंपनीतील २४ तास सुरू असलेल्या हिटींग प्रोसेस व प्रदूषणामुळे वरठी येथील वातावरणात उष्णता जास्त जाणवत असल्याचे चित्र आहे. या वर्षीचा उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. सध्या भंडाराचे तापमान ४५ अंशावर आहे. वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आर्यन अँन्ड स्टील कंपनीतून २४ तास उच्च तापमानावर उत्पादन प्रक्रि या सुरू असते. यामुळे वरठी व परिसरातील एकलारी, बीड, नेरी, पाचगाव, पांढराबोडी, सिरसी येथे नियमित नोंद असलेल्या तापमानाव्यतिरिक्त जास्त तापमान असल्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा शहर व इतर भागापेक्षा वरठी व परिसरात उष्णतेचे चटके जास्त असल्याचे अनुभव नागरिकांना येत आहे. वरठी येथे स्वतंत्र तापमान मोजण्याचे यंत्र लावण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
वरठी हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे सनफ्लॅग आयर्न अँन्ड स्टील कंपनी आहे. सनफ्लॅग कंपनीच्या सुरक्षा भिंतीपासून ५0 फूट अंतरावर लोकवस्ती आहे. या कंपनीच्या चारही बाजूंनी वस्ती असून कंपनीतून निघणार्‍या प्रदूषण व विषारी दुर्गंधीमुळे येथील ७ गावांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. विदर्भातील इतर स्टील कारखान्यांपैकी सनफ्लॅग कंपनीची उत्पादन क्षमता जास्त आहे. लहानमोठे असे अनेक उत्पादन एकक कंपनीत आहेत. कंपनी २४ तास सुरू असते. कंपनीतील जास्तीत जास्त उत्पादक एकक हे हिटींग प्रोसेसमध्ये चालतात. कच्च्या मालाला शुद्ध करण्यासाठी कंपनीत उच्च तापमानावर प्रक्रि या होतात. आधीच उन्हाळा जीवघेणा व त्रासदायक आहे. अशा परिस्थितीत वरठी परिसरात बाराही महिने तापमान जास्त असल्याचा अनुभव येतो. कंपनीतून निघणार्‍या प्रदूषण व वायू दुर्गंधीमुळे नागरिकांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. सध्या जिल्ह्यात उष्णतेचा पारा भडकला आहे. नियमित नोंद असलेल्या तापमानाव्यतिरिक्त येथे जास्त तापमान असतो. कंपनीत बायलर, बीएसएम, डीआरपी, एमएमएस सिंटर प्लांट, ब्राइट बार इत्यादी सर्वएकाकात उत्पादन प्रक्रि या ही डीटींग प्रोसेसनुसार केली जाते. एमबीएफ एककात विषारी वायू असतो. उत्पादन प्रक्रि येअंतर्गत निघणारी उष्णता व प्रदूषण कमी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. उत्पादन प्रक्रि येअंतर्गत होणारा विषारी वायू व उष्णता चिमनीद्वारे वातावरणात सोडले जाते. धूर सोडणार्‍या चिमण्यांची उंची कमी आहे. २४ तास निघणारे धूर हे वातावरणात पसरतात व यामुळे वातावरण प्रदूषित होते. प्रदूषित हवेबरोबर धूर वातावरणात पसरतात व यामुळे वातावरण प्रदूषित होते. जिल्ह्यातील इतर भागापैकी वरठी व परिसरात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याचे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले. सनफ्लॅग कंपनीमुळे होणार्‍या उष्णतेवर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे. वरठी येथे स्वतंत्र उष्णता मोजणारे यंत्र लावण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.