सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन साधूंच्‍या गटात फायरिंग

0
11

उज्जेेन (मप्र)- उज्‍जेनमध्‍ये सिंहस्थ कुंभमेळ्यात गुरुवारी नागा साधुंच्‍या दोन गटात सुरू झालेला वाद अखेर गोळीबाराने संपला. दोन गटात काठ्या, तलवारी निघल्‍या. त्‍यानंतर गोळीबार सुरू झाला. दरम्‍यान, 6 साधू जखमी झाले असून त्‍यांंना हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. आव्‍हान आखाड्यात ही घटना घडली आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज केडिया यांनी सांगितले, हा वाद एकाच आखाड्यातील आहे. येथे आव्‍हान आखाड्याच्‍या श्रीमहंत पदासाठी निवडणूक होणार होती. मागील 10 दिवसांपासून या पदासाठी ब्रजेश पुरी महाराज यांचे नाव चर्चेत आहे. गुरुवारी नीलकंठ गिरी महाराज यांनी गणेशपुरींंना श्रीमहंत घोषित केले. यामुळे नाराज असलेल्‍या ब्रजेश पुरी महाराज यांच्‍या समर्थकांनी उग्र भूमिका घेतली. थोड्याच वेळात वाद चिघळला नि दोन्‍ही गटात मारपीट सुरू झाली. दोन्‍हीकडून तलवार आणि त्रिशूलचा वापर करण्‍यात आला. दरम्‍यान एका साधूने गोळी झाडली. ओमपुरी महाराज यांना ही गोळी लागली. त्‍यांना त्‍वरीत माधव नगर हॉस्पिटलमध्‍ये हलविले. डॉक्‍टरांनी ऑपरेशन करून गोळी काढली. त्‍यांची प्रकृती आता धोक्‍याबाहेर आहे. त्‍यांच्‍याशिवाय इतर 6 साधूू या हल्‍ल्यात जखमी झाले आहेत.