गोंदिया,दि.16- जिल्हा कुणबी समाज संघर्ष कृती समितीतर्फे गोंदिया येथील पवार सांस्कृतिक सभागृहात कुणबी जन आक्रोश जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते.जन आक्रोश सभेनंंतर उपस्थित समाज-बांधवांनी रॅली काढून डाॅ.आंबेडकर चौकातील प्रशासकीय इमारतीवर ध़डक देत आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.या निवेदनात
मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी आमची स्पष्ट मागणी केली आहे. शासन दरबारी या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणावर एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
गोंदियातील या सभेत माजी खासदार मधुभाऊ कुकडे,माजी मंत्री डाॅ.परिणय फुके, माजी आमदार रमेश कुथे,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर,जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सोनु कुथे,अमर वराडे,प्रेमलाल कढव,प्रभाकर दोनाडे,गजेंद्र फुंडे,दुलिचंद बुध्दे,चंद्रप्रकाश चुटे,उदय पिल्लारे, राजेश चुटे,खुमेंद्र मेंढे,राजेश चतुर,काशिरम हुकरे,कमलबापू बहेकार,बंटी पंचबुद्धे,सौ बहेकार तसेच असंख्य समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.