ओबीसी जन आक्रोश महाआंदोलन १८ ला गोंदियात

0
25

गोंदिया,दि.16– ओबीसी जनगणना व ओबीसीच्या आरक्षणात होत असलेल्या घुसखोरीच्या विरोधात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी अधिकारी  महासंघ, ओबीसी अधिकार मंच इत्यादी संघटनेच्या नेतृत्वात ओबीसी जन आक्रोश महा आंदोलन दिनांक 18 सप्टेंबर सोमवारला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात, प्रशासकीय इमारतीच्या समोर नियोजन करण्यात आलेला आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती तसेच जिला महासचिव ओबीसी संघर्ष कृती समिती रुपेश (सोनू) कुथे, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति गोंदिया /तालुका प्रभारी ओबीसी संघर्ष कृती समिती इंजि राजीव ठकरेलेनी गोंदिया तालुक्यातील टेमणी गावातील चौक असलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रचाराची सुरुवात केली.तालुक्यातील 70 पेक्षा अधिक गावापर्यंत प्रचार यात्रा पोहोचली आहे. आणि प्रत्येक गावात ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच व आपल्या संविधानिक अधिकारात होत असलेली घुसखोरी बद्दल सविस्तर माहिती लोकांना देण्यात येत आहे.आंदोलनाला यशस्वी करायला सर्व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व जातीच्या पुढार्‍यांच्या मोठा सहकार्य भेटत आहे.
आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत उपस्थिती राहण्याची अपिल ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष बब्लू कटरे,अमर वराडे, खेमेंद्र कटरे, सोनु कुथे, इंजि राजीव ठकरेले, सुनील पटले, बंटी पटले, कैलाश भेलावे, सावन कटरे, सावन डोये, एस. यु वंजारी, चंद्रकुमार बहेकार, अशोक लंजे, दिनेश हुकरे,हरिश तुळसकर, कमल हटवार, राहुल हटवार, मनोज डोये, प्रकाश पटले, संतोष ठाकुर, सुर्यप्रकाश भगत मनोज शरनागत, तिर्थराज ऊके, राजेश नागरीकर, विष्णु नागरिकर, अजय राहांगडाले, रामेश्वर लिल्हारे, नामदेव वैद्य इत्यादि ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.