गोंदिया : आरक्षणाला घेवून मागील दिवसांपासून राज्यात उद्भवलेली स्थिती तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तसेच समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेवून ओबीसी संघटनांच्या वतीने आज १८ सप्टेंबर रोजी स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर जऩ आक्रोश आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाल्याने मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती.अनेेक वर्षाच्या संघर्षानंतर व ओबीसी संघटनाच्या सातत्याने करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे हजारोच्या संंख्येने उतरलेल्या ओबीसी समुदायानेही सरकारला आम्ही आता जागे झालो असा इशाराच जणू काही या जन आक्रोश मोर्च्यातून दिल्याचे बघावयास मिळाले.या जन आक्रोश रॅलीचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले.
फूलचूर येथून गोंदिया,तिरोडा, आमगाव,देवरी,सालेकसा,गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो ओबीसी पदयात्रा व मोटारसायकल रॅलीने जयस्तंभ चौकाकडे रवाना झाले.यामुळे शहरातील रस्त्यांवर ओबीसींच्या पिवळ्या झेंड््यांनी शहर ओबीसीमय झाल्याचे दिसून आले.मागील काही वर्षापासून आरक्षणाला राज्य शासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. राज्यासह जिल्ह्यात निघणार्या विविध पदभरत्यांमध्ये ओबीसीचे आरक्षणावर गदा आणण्यात येत आहे. शिवाय ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी थांबविण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील पोलिस पाटील पदभरतीतील ओबीसींवरील अन्याय दूर करण्यात यावे या मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.या महामोर्च्यामुळे मात्र जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनांचीही तारांबळ उडाल्याचे दिसून आले.जन आक्रोश सभेचे संचालन सुनिल पटले यांनी केले.
आंदोलनात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, ओबीसी अधिकार मंच , ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी अधिकार मंच, युवा ग्रॅज्युएट फोरम, संविधान मैत्री संघ, अवामे मुस्लिम समाज गोंदिया तसेच आदिवासी,युवा बहुजन मंच, एसबीसी, एनटी संघटनांनी,आदिवासी संंघटनासह ओबीसीतील सर्व जात संघटनाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.
जन आक्राेश सभेला उपस्थितांची हजेरी
जयस्तंभ चौकात आयोजित जन आक्रोश सभेला ओबीसी संंघर्ष समितीचे अमर वराडे,संघटनेेचे महासचिव जि.प.सभापती सोनु कुथे,अशोक लंजे,पुष्पा खोटेले,कैलास भेलावे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर,प्रदेश उपााध्यक्ष सावन कटरे,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार रमेेश कुथे, जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,आमदार सहसराम कोरेटे,माजी आमदार दिलीप बनसोड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे,माजी सभापती रमेश अंबुले,ओबीसी संघर्ष समितीचे राजीव ठकरेले,महासचिव शिशिर कटरे,राजेश नागरीकर,धन्नालाल नागरीकर,पवार प्रगतिशील संस्थेचे अध्यक्ष एड.पी.सी.चव्हाण,किशोर भगत, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मनोज मेंढे, मूस्लीम समाज संघटनेचे मोहसीन खान,संंविधान मैत्री सघाचे अतुल सतेदेवे,ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे,ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोर्राम,सर्वसमाज ओबीसी संघटनेचे तिर्थराज उके, बहुजन युवा मंचचे सुनिल भोंगाडे,फुलचूर ओबीसी संघर्ष समितीचे राजकुमार पटले,शिव नागपूरे,ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंंघाचे संदिप तिडके,एस.यु.वंजारी,किशोर डोंगरवार,रवी अंबुले,सुरेंद्र गौतम,समाजसेविका सविता बेदरकर,जि.प.सदस्या विमल कटरे,जि.प.सदस्य जितेंद्र कटरे,जगदिश बावनथडे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पकंज यादव,कर्मचारी महासंघाचे लिलाधर पाथोडे,केतन तुरकर,दिनेश हुकरे,महेंद्र बिसेन,सावन डोये,सुधीर ब्राम्हणकर,मनोज डोये,हरिष ब्राम्हणकर,भुमेश ठाकरे,तिरखेडी सरपंच प्रिया हरिणखेडे,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार,खुमेंद्र मेंढे,ओम पटले,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वाय.टी.कटरे,गौरव बिसेन,प्रविण बिसेन,रवी पटले,अजाबराव रिनायत,गुड्डू लिल्हारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.