कीटकजन्य आजार जनजागृती

0
8

गोंदिया : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत येथील बाई गंगाबाई रक्तपेढीत जागतीक डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. उद््घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून घनश्यामलाल अग्रवाल तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सुवर्णा हुबेकर, मेट्रन मेश्राम व हिवताप कार्यालयाचे पर्यवेक्षक किशोर भालेराव उपस्थित होते. विशेष म्हणजे यानिमित्त आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.मोहबे यांनी डेंग्यूपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करावा असे आवाहन केले. प्रास्तावीक पर्यवेक्षक भालेराव यांनी मांडले. संचालन करून आभार अनिल गोंडाणे यांनी मानले