देसाई, रावते विधान परिषदेवर

0
12
मुंबई- शिवसेनेचे उपनेते व सामनाचे संपादक संजय राऊत यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना विधान परिषदेवर पुन्हा पाठवण्यात येणार आहे.
संजय राऊत यांची 4 जुलै 2016 रोजी राज्यसभेतील सहा वर्षाची मुदत संपत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होत आहे. संख्याबळानुसार 5 जागा भाजपच्या, 3 जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तर 2 जागा शिवसेनेच्या निवडून येऊ शकतात. त्यानुसार शिवसेनेने मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना पुन्हा संधी दिली आहे.