मूलभूत सुविधा,वनहक्क पट्टयांसाठी एकजुटीने प्रयत्न-आ.चंद्रिकापुरे

0
3

नगरपंचायतच्या वतीने दिव्यांग निधी,पंतप्रधान स्वनिधी आणि भूखंड पट्टे वाटप…
अर्जुनी मोरगाव-२०१५ ला नगरपंचायतची स्थापना झाली.मात्र त्या काळात हवे तसे विकास कामे झाली नाहीत.स्वच्छ पाणी,पक्के रस्ते गटारे,विद्युतीकरण,सार्वजनिक स्थळांचे सौंदर्यीकरणासारखी विधायक कामे नगरपंचायतची जबाबदारी आहे.शहरात ७७० अतिक्रमण धारक आहेत.मालकीचे भूखंड नसल्याने हे लाभार्थी घरकुलासह अनेक योजनांपासून वंचित आहेत.२००९ पासून वनहक्काचे प्रकरणे प्रलंबीत आहेत.या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
ते नगरपंचायतच्या वतीने स्वछता ही सेवा अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित दिव्यांग निधी,पंतप्रधान स्वनिधी आणि भूखंड पट्टे वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष ललिता टेंभरे,सभापती यशकुमार शहारे,नगरसेवक दाणेश साखरे,नगरसेविका शीला उईके,संध्या शहारे,इंदू लांजेवार,दीक्षा शहारे,सुषमा दामले,सपना उपवंशी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात म. गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाणे झाली.
आ.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले,हर घर जल या अभियानासाठी पाणीपुरवठा योजनेतील अडचण,शहरी भागातील बचत गटांच्या अडचणी मार्गी लावू.संविधान चौक,हनुमान मंदिर,बिरसा मुंडा चौक आणि आदिवासी गोवारी स्मारक यांच्या भूखंडासाठी प्रयत्न सुरू आहेत.वन हक्क पट्ट्यासाठी दोनदा मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.शहर विकासाचा आराखडा तयार करून मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी नगराध्यक्ष बारसागडे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली.आबादी भूखंड धारक ११ लाभार्थ्यांना पट्टे वाटप,७९ लाभार्थ्यांना दिव्यांगनिधी,६४ फुटपाथ विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरात ३५ ठिकाणी एक तास स्वच्छता अभियान राबविण्यात आला.या अभियानात एस.एस. जे.महाविद्यालय,सरस्वती विद्यालय,जिल्हा परिषद हायस्कूल,न्यू मून इंग्लिश मीडियम हायस्कूल,बहुउद्देशीय हायस्कूल यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजू घोडके,संचालन सुमित मेश्राम, आभार नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतचे करनिर्धारण अधिकारी सुशांत आरु,अभियंता निखिल बंड,मनीषा मेश्राम,इंजि.दीपक राऊत,कमल कोहरे,तुषार सांगोळे,सुरेश बोरीकर,दुर्योधन नेवारे,अश्विनी शहारे,मिथुन कोचे,शुभम गौरकर,नयन शहारे,चिराग भीमटे यांनी सहकार्य केले.
नगरसेवक मला फोन करीत नाही
आमदारांनी नगरसेवकांबद्दल,मी या ठिकाणी निवासी राहतो मात्र मला नगरपंचायतच्या अडचणी बद्दल नगरसेवक फोन करीत नसल्याची खंत व्यक्त केली. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी माझी आहे.आपण एकजुटीने सर्वांगीण विकास सधण्याचे आवाहन केले.