ॲक्यूट पब्लिक शाळेत “स्वर्गीय के.डी.भास्कर” यांची जयंती उत्साहात

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.05ः- येथील ॲक्यूट पब्लिक शाळेत स्वर्गीय के.डी.भास्कर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात के. डी. भास्कर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलित करून करण्यात आली.
त्यांच्या जन्म दिनांक ०४ अक्टूबर १९४४ ला झाला होता त्यांच्या हा ७९ वा जन्मदिवस साजरा करून त्यांच्या सेवाभावी कार्याची आठवण करण्यात आली. ते मनानी प्रेमळ, सौज्वळ, गोर-गरीबांची मदत करणारे सेवाभावी, निस्वार्थी व आदर्श शिक्षक होते. त्यांनी आपल्या हयातीत शाळा स्थापना केली.के. डी. भास्कर हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डांगोरली, ॲक्यूट पब्लिक स्कूल कटंगीकला व रोझी किड्स कॉन्वेंट, रावनवाड़ी अशा शैक्षणिक संस्था स्थापना केली. शिक्षक हा विद्यार्थ्यामध्ये उचित संस्कार व नैतिक मूल्यांची कजवणून करणारा असावा असे त्यांचा मत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या” प्रेरणास्त्रोत गीताताई भास्कर,सचिव संजय भास्कर,सह सचिव श्रीमती एस. शुभा, मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला, मुख्याध्यापक श्री कापगाते, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीवृंद उपस्थित होते.