अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील माटी कलश मुंबईला रवाना

0
6

अर्जुनी मोर.- हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे अमृत वाटीका तयार करण्यात येत असुन या वाटीकेसाठी “मेरी माटी मेरा देश” या अभिनव उपक्रमा अंतर्गत अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील गावागावातुन माती अमृत कलश मधे संकलित करण्यात आली असुन अमृत कलश माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे नेतृत्वात दि.27 ऑक्टोबर रोजी विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना करण्यात आला.

“मेरी माटी मेरा देश” अभियान अंतर्गत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पवित्र मातीचे संकलन गावोगावी फिरून करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज अमृत्त कलशात संकलित केलेली माती विदर्भ एक्सप्रेस ने मुंबई ला पाठवण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता अमृत कलश घेऊन अर्जुनी मोरगाव येथून वॉर रूम सडक अर्जुनी कडे प्रस्थान करण्यात आले नंतर पुढे भाजप कार्यालय सडक अर्जुनी ते गोंदिया रेल्वे स्थानक असा प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघालो.

यावेळी विजय शिवणकर लोकसभा निवडणूक प्रमुख, दिपक कदम जिल्हा संयोजक मेरी माटी मेरा देश, लायकराम भेंडारकर गटनेते तथा जी.प.सदस्य, डॉ. लक्ष्मण भगत, लक्ष्मीकांत धानगाये तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी, विजय कापगते तालुका अध्यक्ष अर्जुनी मोरगांव, संजय बारेवार तालुका अध्यक्ष गोरेगाव, जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहिवले, मनोज बोपचे सभापती प.स.गोरेगाव, कृ.उ.बा.स. गोरेगाव सभापती गिरिधारी बघेले, ओमप्रकाश पवार, जयंत शुक्ला, शालिंदर कापगते उपसभापती प.स.सडक अर्जुनी, रामेश्वर मारवाडे, चेतन वळगाये प.स. सदस्य, अशोक लंजे, शिशिर येळे, तुकाराम राणे, फनिद्र पटले, रवींद्र पटले, अनंत ठाकरे, पद्मताई परतेकी, कविताताई रंगारी, चंद्रकलाताई डोंगरवार, निशाताई तोडासे, दिपाली ताई मेश्राम, वर्षाताई शहारे, राधेशाम भेंडारकर, गुड्डु डोंगरवार, ललित डोंगरवार, डिलेश सोनटक्के, सुभाष कोळमते, किशोर मेश्राम, अविनाश नाकाडे आदिसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.