” साप्ताहीक आरोग्य मेळावे “जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या भेटी

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.28-समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. वैद्यकिय महाविद्यालय, ग्रामिण रुग्णालय, आरोग्य वर्धिनी केंद्र व उपकेंद्रातुन लोकांना लोकोपयोगी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, स्वच्छ भारत अभियान, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहिम, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी, वय वर्ष 18 वरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी त्यात “निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियान अशा विविध उपक्रम चार महिन्यात राबविण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी सर्व आरोग्य संस्थाना दिले आहे.
दि.28 ऑक्टोंबर रोजी साप्ताहीक आरोग्य मेळावे घेण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत संसर्ग आजार जसे क्षयरोग, कुष्ठरोग ई. बाबत तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा देण्यात आले.तसेच आभा कार्ड ,आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण ह्याबाबत जनजागृती करण्यात आली.
दि. 28 ऑक्टोंबर “ साप्ताहीक आरोग्य मेळावे  मोहीमे दरम्यान जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी जिल्ह्यातील काही आरोग्य संस्थाना भेटी देवुन उपक्रमाची पडताळणी केली. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव, ईंदोरा सुकडी/डा. तर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य खमारी,रावणवाडी व मोरवाही तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. देव चांदेवार यांनी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य कुर्हाडी व कवलेवाडा या आरोग्य संस्थाना भेटी दिल्या. यावेळी तिरोडाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुबोध थोटे, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक रविंद्र श्रीवास,आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे नागपुरे हे सुद्धा उपस्थित होते.
सर्व आरोग्य संस्थानी “निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे ” मोहिमे अंतर्गत 18 वर्ष वयोगटावरील पुरुषांची गावनिहाय यादी ठेवुन तपासणी व आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या करुन तपासणी होत असलेल्या लोकांची माहिती पोर्टल वर अद्यावत  ठेवणे, कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांचे आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे निर्देश सर्व आरोग्य संस्थाना दिले आहे.भेटी दरम्यान वैद्यकिय अधिकारी ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका व तेथील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.