वीज पडून २३ जखमी

0
5

कुरखेडा-तालुक्यातील पलसगड परिसरातील चारभट्टी ग्रामपंचायतींतर्गत पिटेसूर येथे रविवारी सायंकाळी साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक मंडपावर वीज कोसळल्याने २३ नागरिक जखमी झाल्याची घटना कुरखेडा  घडली. पिटेसूर येथील झाडूराम केसू हारामी यांची मुलगी रूपाली झाडूराम हारामी (वय २२) हिचे लग्न जुळले आहे. तिच्या साक्षगंधाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी सुरू होता. दरम्यान, वादळी पावसासह अचानक वीज कोसळल्याने रूपालीसह तिचे आईवडील व नातेवाईक मिळून एकूण २३ लोक जखमी झाले असून २ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले ,अनेक भागातील विज पुरवठा देखील खंडित झाला होता.