लांजीनजीकच्या टेमणीत दारुदुकान जाळल्याने दोघांचा मृत्यु

0
17

गोंदिया-महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील टेमणी येथील देशी दारुच्या दुकानाला 5 जूनच्या मध्यरात्री आग लावून त्या दुकानात असलेल्या दोघांना जिंवत जाळण्यात आल्याची घटना घडली.याप्रकरणाने बालाघाट जिल्ह्यात खळबळ माजली असून पोलीस महानिरिक्षकासह ,पोलीस अधिक्षकांनीही सकाळीच घटनास्थळ गाठून पाहणी केली.या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस सुत्रानुसार गावकरी आणि दारुदुकानदारातील कर्मचारी यांच्याशी काही वाद असावा त्यामुळेच ही घटना घडली.यात देशी दारु दुकानाचा ठेकेदाराची दोन कर्मचारी जे येथेच राहायचे त्यामध्ये बिहार राज्यातील बिसडाह येथील अमरिंदर राजपूत(वय 25) तर उत्तरप्रदेशातील बेलरी पोलीस ठाणेंतर्गतचा रामविलास यादव ( वय 22) यांची घटनास्थळीच जळून मृत्यु झाला.दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पोलीस महानिरिक्षक डी.सी.सागर,पोलीस अधिक्षक गौरव तिवारी,लांजीचे एसडीएम जी.सी.डेहरीया यांनी गावात येऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.109 लोकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून वृत्तलिहिपर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली होती.