सडक/अर्जुनी येथे भव्य दिव्य महाआरोग्य शिबीर संपन्न
सडक/अर्जुनी.–अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील समस्त मतदार व प्रत्येक मानव समाजाचे माझ्यावर ऋण आहेत.ते फेडण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. मी आजही जनतेच्या विश्वासाला तळा जाऊ देत नाही. मी सत्तेत असो वा नसो परंतु जनहितार्थ आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करीत आहे. आजही समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा अशीच आपली भूमिका आहे. सोबतच जे काही विकासाची कामे बाकी आहेत तेही आपण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अनेक लोक विविध आजाराने ग्रस्त आहेत. काही लोक महागडे उपचार करू शकत नाही. त्यासाठी आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणत्याही आजारांचे निशुल्क उपचार व्हावे म्हणून सडक अर्जुनी येथे महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. कारन गोरगरीब रुग्णांची आरोग्यसेवा हीच खरोखर ईश्वर सेवा आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री या विभागाचे माजी आमदार इंजिनीयर राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात आरोग्याच्या भेडसावत असणा-या समस्या घेवुन माजी मंत्री राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या सौजन्याने ता.७ जानेवारी रोजी सडक/अर्जुनी येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानावरुन माजी मंत्री बडोले बोलत होते.
एच.एन.टी.कनिष्ठ महाविद्यालय सडक/अर्जुनी येथे आयोजित या महाआरोग्य शिबिराला विशेष अतिथी म्हणुन गोंदिया चे जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अर्जुनी मोर. चे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, डाॅ. अमृता चौधरी, डाॅ. केशव नागपुरे, डाॅ. नितीन शेरकर, डाॅ. राजेंद्र जैन, डाॅ. लोकेश मानकर, डाॅ. अमितकुमार बोसे, डाॅ. अक्षय आंबीलकर, डाॅ. नाकाडे, डाॅ. विनीता यादव, डाॅ. संजय गाडे, डाॅ. अरविंद डोंगरवार, डॉ. तुरकर, डॉ. लोकेश मेश्राम, डॉ. गुप्ता ,डॉ. प्रभाकर गहाणे, डॉ. रोशन देशमुख, डॉ. सतीश लंजे, डॉ. परमानंद कटाने, डॉ. परमानंद कापगते, डॉ. प्रवीण उजवणे,गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते लायकराम भेंडारकर, सडक अर्जुनी तालुका भाजपा अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, अर्जुनी मोरगाव तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, सौ. शारदाताई बडोले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्या निशा तोडसे ,तथा रत्नदीप दहिवले, रीता लांजेवार, छायाताई चव्हाण, चेतन वडगाये, सपना नाईक, तहसीलदार निलेश काळे, नायब तहसीलदार सरद हलमारे,मधु अग्रवाल, राजेश कठाणे, ललित डोंगरवार, सरपंच प्रतिभा भेंडारकर, उपसभापती होमराज पुस्तोळे, महामंत्री लैलेश्वर शिवनकर, अंजली मुनेश्वर व खेमराज भेंडारकर व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .एआयआयएमएस नागपुर, जिएमसी हाॅस्पीटल नागपुर, जिएमसी गोंदिया, जिडीसी नागपुर, होप हाॅस्पीटल गोंदिया, बिजे हाॅस्पीटल गोंदिया, आशा हाॅस्पीटल कामठी, महात्मे आय हाॅस्पीटल नागपुर, आयुष्य हाॅस्पीटल गोंदिया, दत्त नर्सिंग कॉलेज तिरोडा, एनआयएमए सडक अर्जुनी व अर्जुनी मोर. येथील प्रसिद्ध व तज्ञ डाॅक्टरांच्या चमुद्वारे कॅन्सर, ह्रदयरोग,बालरोग तज्ञ,स्रिरोगतज्ञ,काननाकघसा ,चर्मरोग, आॅर्थोपेडीक, मानसिक रोग,दंतरोग, तथा नेत्ररोग रुग्णांची तपासणी औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. व मोफत चष्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरात येणा-या रुग्णांची फ्री शुगर तपासणी, तथा ईसिजी मोफत काढण्यात येवुन औषध वितरण करण्यात आले. या भव्य महाआरोग्य शिबीरात विशेष तज्ञ डाॅक्टर व विविध आरोग्य सेवा उपलब्ध असल्याने सुमारे ३०३२ रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. आरोग्य शिबीरात तज्ञ डाॅक्टरांनी ग्रामीण भागात मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी मंत्री राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने सर्व डाॅक्टरांचे स्मृतीचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.